कुमार केतकर - लेख सूची

समानतेचे अवघड गणित

समता, समानता आणि समरसता या संज्ञा-संकल्पना वरवर समानार्थी वाटल्या तरी त्यातील आशय आणि अन्वयार्थ वेगवेगळे आहेत. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर (1779) लिबर्टी (स्वातंत्र्य), इक्वॅलीटी (समता) आणि फ्रॅटर्निटी (बंधुत्व) या घोषणा एक तत्त्व म्हणून जगाच्या प्रगत इतिहासात रूजत गेल्या. परंतु त्या प्रत्यक्षात आणणे व्यक्तीगत व सामाजिक जीवनात सोपे नाही. किंबहुना अनेकदा समता आणि स्वातंत्र्य या संकल्पना तर परस्परविरोधात …

विलास आणि विकास

अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर अपेक्षेप्रमाणे अजूनही वादळी चर्चा आणि घमासान धुमश्चक्री चालू आहे. ते स्वाभाविक आहे. कारण ‘अर्थकारण’ हे राजकारणाचाच अविभाज्य भाग असते. त्या दृष्टिकोनातून अर्थकारण म्हणजे सत्ताकारणही असते. सत्तेत असलेला वर्ग आपल्या प्रस्थापित वर्गाच्या हितसंबंधांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी इतर (म्हणजे गरीब व मध्यम वर्ग) सामाजिक स्तरांना चुचकारण्याचा प्रयत्न करतो. त्या दृष्टिकोनातून …

ब्ल्यू-प्रिण्टचे ‘टायमिंग’

तोडफोड, दमबाजी, घोषणाबाजी याच्यापलीकडे जाऊन स्थानिकांच्या हिताचे विवेकी राजकारण करणाऱ्यांची या राज्यात गरज आहे. परंतु भावनिक हिंदोळ्यावर बसून स्वतःचे झोके आभाळात घेऊन जायचे आणि तेथून हात उंचावून भक्तांना दर्शन द्यायचे, याच पद्धतीने अस्मितेचे राजकारण सुरू आहे. राज्याच्या विकासाची ‘ब्ल्यू प्रिण्ट’ राज्यावर आल्यानंतर बनविता येत नाही, ती ‘ब्ल्यू प्रिण्ट’ दाखवून राज्यावर यावे लागते. परंतु सत्ताधारी आणि …

विनाशकाले विपरीत ‘धर्म’

अलिकडेच तीन आंतरराष्ट्रीय परिषदा झाल्या. एक मुंबईत, दुसरी ढाका येथे आणि तिसरी ब्रुसेल्सला. तीनही ठिकाणी चर्चासत्रांचा मुख्य विषय होता – धर्म आणि दहशतवाद. धर्म हा हिंसेची वा हत्याकांडाची प्रेरणा कशी होऊ शकतो? गांधीजींची हत्या करणारा नथुराम कोणत्याही व्यक्तिगत स्वार्थाने प्रेरित झालेला नव्हता, तर प्रखर हिंदुत्वाने भारलेला होता. इंदिरा गांधींना ठार मारणारे शीख सुरक्षा गार्ड्स हेही …

राष्ट्रवादाचे पुनर्मूल्यांकन

राष्ट्रवादाचा अस्त होतो आहे मी काही तथाकथित देशभक्त नाही. उलट कधी कधी तर मला माझ्या देशबांधवांच्या काही कृत्यांबद्दल लाजच वाटते. मला असे वाटते की राष्ट्रवाद आणि देशभक्ती या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. भारतीय असणे ही काही माझी स्वतःची निवड नव्हती. मी इथे जन्माला आलो आणि म्हणून आपोआप भारतीय ठरलो. मी दुसऱ्या कोणत्या देशात जन्माला आलो …